रोज ३ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्रीपेड प्लान्स;जाणून घ्या डिटेल्स…

रोज ३ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्रीपेड प्लान्स;जाणून घ्या डिटेल्स…

 

 

टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक जबरदस्त प्लान ऑफर केलेले आहेत.रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाचे असे काही प्लान आहेत. ज्यात युजर्संना रोज ३ जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएसची सुविधा मिळते. या तिन्ही कंपन्यांचे बेनिफिट्स वेगवेगळे असून या प्लानची किंमतही वेगळी आहे. यात युजर्संना असे काही प्लान पसंत पडतात ज्यात कमी किंमतीत जास्त डेटा आणि फ्री कॉलिंग मिळते.. जाणून घ्या अशा काही खास प्लानविषयी.

रिलायन्स जिओचा ३ जीबी डेटा प्लान
रिलायन्स जिओने आपल्या युजर्संसाठी रोज ३ जीबी डेटाचे तीन प्लान ऑफर केलेले आहे. ३४९ रुपयांचा प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा सोबत कंपनी रोज १०० फ्री एसएमएस देत आहे. या प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग देते. तर जिओ नेटवर्कसाठी या प्लानमध्ये १ हजार फ्री मिनिट्स मिळते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.

४०१ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी डेटा सोबत ६ जीबी एक्स्ट्रा डेटा ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये कंपनी जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि दुसऱ्या नेटवर्कसाठी १ हजार नॉन एफयूव्ही मिनिट देते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस देते. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कंपनी ३९९ रुपयांच्या किंमतीचे डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री देते.

जिओचा ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी डेटा देते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देते. तसेच रोज १०० फ्री एसएमएस देते. दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग साठी ३ हजार फ्री मिनिट्स देते.

एअरटेलचा रोज ३ जीबी डेटा प्लान
एअरटेल आपल्या ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर करीत आहे. २८ दिवसांची वैधता मिळणाऱ्या या प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस मिळते. प्लानमध्ये कंपनी एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्यूझिकचे सब्सक्रिप्शन फ्री देते. फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक देते.

तसेच कंपनी आपल्या ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा रोज ३ जीबी डेटा देते. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस दिले जाते. प्लानमध्ये अतिरिक्त ३४९ रुपयाचे बेनिफिट्स मिळते.

वोडाफोन आयडियाचे ३ जीबी डेटाचे प्लान
वोडाफोन-आयडियाचे ३९८ रुपये आणि ५५९ रुपयांचे प्लान मध्ये ३ जीबी डेटा दिला जातो. ३९८ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे तर ५५८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. दोन्ही प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येवू शकते.

अभिप्राय द्या..