पुणे :

‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणा’च्या २०१९-२०च्या अहवालातून पुण्यातील पाच वर्षांच्या आतील बालकांसह १५ ते ४९ या वयोगटातील ५८ टक्के महिला कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत ही माहिती उजेडात आली आहे. सहा महिने ते पाच वर्षे वयाच्या बालकांना अॅनिमिया असल्याचेही दिसून आले आले. अॅनिमियाचे प्रमाण २०१५-१६मधील ५३.४ टक्क्यांवरून २०१९-२०मध्ये ५८.७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. १५ ते ४९ या वयोगटातील गर्भवती नसणाऱ्या महिलाही कुपोषित असल्याचे आढळले आहे. पाच वर्षांत हे प्रमाण ५०.४ टक्क्यांवरून ५३.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. याच वयोगटातील गर्भवती महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण पाच वर्षांपूर्वी ४० टक्के होते.

सहा ते तेवीस महिन्यांच्या ९.६ टक्के बालकांना पुरेसे आहार मिळत आहे. पाच वर्षांपूर्वी हेच प्रमाण ८.२ टक्के होते. वयाच्या तुलनेत पाच वर्षांखालील ३०.७ टक्के बालकांची उंची वाढल्याचे आढळले आहे. यापूर्वी हे प्रमाण २२.४ टक्के होते. पाच वर्षांखालील ३२.७ टक्के बालकांचे वजन वयानुसार नसल्याचे आढळले आहे. उंचीच्या तुलनेत वजन अधिक असलेल्या बालकांचे प्रमाण १.३ टक्के आहे.

या अहवालात १५ ते ४९ या वयोगटातील महिलांच्या आहाराची स्थितीही नोंदविण्यात आली आहे. महिलांची उंची आणि वजनानुसार ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) साधारणपणे १८पर्यंत असणे अपेक्षित आहे. मात्र, या वयोगटातील १९.६ टक्के महिलांचा ‘बीएमआय’ १८पेक्षा कमी असल्याचे आढळले आहे. २५पेक्षा अधिक ‘बीएमआय’ असलेल्या महिला लठ्ठ असल्याचे समजले जाते. २००५-०६ या वर्षात ३०.२ टक्के महिलांचा ‘बीएमआय’२५पेक्षा अधिक असल्याची नोंद झाली होती. त्या ‘बीएमआय’मध्ये आता वाढ झाली असून, सद्यस्थितीत पुण्यातील ३१ टक्के महिला लठ्ठ असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page