आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी..

आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी..

वेंगुर्ला /-

तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी होणार असून त्यासाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार आहेत.आरवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक ते तीन प्रभागातील एकूण नऊ सदस्यांसाठी तसेच सागरतिर्थ ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक ते तीन प्रभागातील एकुण नऊ सदस्यांची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाटी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत ( २५, २६, २७ डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार आहेत.३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून नामनिर्देशन पत्रांची छााननी तहसिल कार्यालयात करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ अशी आहे. याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिध्द करुन नंतर त्यांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० वा. पर्यंत संबंधित मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..