कोल्हापूरातील नेहरुनगर विद्यालयात स्वच्छ्ता मोहीम..

कोल्हापूरातील नेहरुनगर विद्यालयात स्वच्छ्ता मोहीम..

कोल्हापूर /-

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त आज रविवार दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी महानगरपालिका नेहरूनगर विद्यालयात व शेजारी प्रभागात नेहरुनगर विद्यालय व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने परिसराची स्वच्छता मोहीम राबवली,स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या गाडगे बाबा यांचे विचारांचे आचरण आज काळाची गरज आहे स्वच्छ्ता अभियाना मध्ये नेहरुनगर शाळेने प्रथम मानांकन मिळवले आहे.
स्वच्छता मोहिमे मध्ये शाळेचे मुख्याध्यापक शहाजी घोरपडे,वहिदा मोमीन,जयश्री आवळे,रामदास वासकर,सुनील पाटील,संजय कडगावे,सरीता कांबळे,तृप्ती माने,विष्णु देसाई,अनिल साळोखे,संजय पाटील,शुभांगी गुरव,अमृता खुडे,रुपाली हावळ व बाबुराव माळी यांनी सहभाग घेतला
कार्यक्रमाचे संयोजन विठ्ठल दुर्गुळे,अनिल शेलार व सचीन हावळ यांनी केले.

अभिप्राय द्या..