मुंबई /-

करोनाने जगभरामध्ये थैमान घातलं आहे. जगभरातील करोना रुग्णांची संख्या ७ कोटी ४८ लाखांपर्यंत पोहचली आहेत. त्यापैकी ५ कोटी २६ लाख रुग्ण या आजारामधून बरे झाले आहेत. तर जगभरात या आजारामुळे १६ लाख ६० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय.जगातील १०० हून अधिक संस्थांमध्ये करोनाची लस शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. करोनासंदर्भातील संभ्रम अद्यापही कायम आहे. सामान्यपणे ताप आणि घसा खवखवणे इथपासून ते अगदी थकव्यापासून इतर काही गोष्टी ही करोनाची लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं.करोनाचा संसर्ग झाल्यानंतर अगदी काहीच न वाटण्यापासून ते थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यापर्यंतचे रुग्ण या कालावधीमध्ये आढळून आले.

सार्क-कोव्ही-२ हा श्वसनाशी संबंधित आजार असून अनेकदा याचा संसर्ग झाल्यास दिसणारी लक्षणं ही सर्दी आणि तापासारखी आहेत.
अगदी साधी लक्षणं असणारे अनेक असिम्पटोमॅटीक म्हणजेच फारसा त्रास न झालेले रुग्णही आढळून आलेत. त्यामुळेच मागील आठ ते दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्दी, घसा खवखवणे, ताप यासारखे आजार असणारे अनेक रुग्ण हे असिम्पटोमॅटीक रुग्ण असल्याचंही निदान झालं आणि ते करोनामधून बरेही झाले. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासामध्ये करोनाचा संसर्ग होऊन गेल्याचं दार्शवणारी पाच लक्षणं सांगितली आहेत.

कोव्हिड-१९ हा श्वसनाशी संबंधित आजार आहे. त्यामुळे या आजाराची लक्षण ही साधा ताप किंवा सर्दीसारखी आहेत. करोनामुळे प्रत्येक व्यक्तीला असणाऱ्या धोक्याचे प्रमाण हे त्या व्यक्तीच्या आरोग्यानुसार बदलते.

करोना हा इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणेच पसरतो. वाहतं नाक, थकवा, दम लागणे, वास न येणे, घसा खवखवणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे ही सामान्यपणे करोनाची लक्षणं आहेत.मात्र अ‍ॅनल्स ऑफ क्लिनिकल अ‍ॅण्ड ट्रान्सलेशनल न्यूरोलॉजी (Annals of Clinical and Translational Neurology) या जर्नलमध्ये करोनासंदर्भातील एका अभ्यासाचा सविस्तर अहवाल छापण्यात आला आहे.या अभ्यासाअंतर्गत संशोधकांनी करोनामधून बऱ्या झालेल्या ४१२ रुग्णांची पहाणी केली. यापैकी ८२ टक्के रुग्णांमध्ये न्यूरोलॉजीसंदर्भातील म्हणजेच मज्जातंतूसंदर्भातील तक्रारी असल्याचे दिसून आलं.तसेच या सर्वांमध्ये अशी काही लक्षणं दिसून आली की ज्या माध्यमातून या रुग्णांना यापूर्वीही करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान शास्त्रज्ञांनी काढलं आहे.यावरुनच त्यांनी करोनाचा संसर्ग होऊन गेल्या व्यक्तींमध्ये काय लक्षणं दिसू शकतात यासंदर्भात अहवालात नमूद केलं आहे. म्हणजेच करोना होऊन गेल्याची लक्षणं काय आहेत आणि करोना होऊन गेल्यानंतर कोणती लक्षणं दिसू शकतात हे या अहवालात सांगण्यात आलं आहे.
डोकेदुखी : सेंटर ऑफ डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनने दिलेल्या माहितीनुसार डोकेदुखी ही करोनाच्या लक्षणांपैकी एक आहे.

अगदी सौम्य डोकेदुखीपासून ते डोकं ठणकण्यापर्यंतचा त्रास अशापद्धतीच्या आजारानंतर होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे.
स्नायूंचे दुखणे : अ‍ॅनल्स ऑफ क्लिनिकल अ‍ॅण्ड ट्रान्सलेशनल न्यूरोलॉजीमध्ये छापून आलेल्या संशोधनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांपैकी ४४.८ टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर स्नायू दुखण्याचा त्रास होऊ लगाला. स्नायू दुखणे हे देखील करोनाचे लक्षण आहे.सतत गोंधळने : विचार करताना सतत गोंधळ होत असल्याचंही या प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या अनेक स्वयंसेवकांनी डॉक्टरांना सांगितलं. या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांपैकी ३१.८ टक्के जणांनी हा त्रास जाणवल्याचं सांगितलं.
या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांपैकी ३१.८ टक्के जणांनी हा त्रास जाणवल्याचं सांगितलं.
चव जाणे आणि वास न येणे : चव आणि वास न येणे हे करोनाचं सर्वसामान्य लक्षणं आहेत. ही दोन्ही लक्षणं जवळजवळ सर्वच रुग्णांमध्ये दिसून येतात.अनेकदा तोंडाची चव गेली किंवा वास येत नसेल तर ते करोनाचा संसर्ग झाल्याचं लक्षण असतं.करोनाचा संसर्ग झालेल्या अनेकांनी डोळे चुरचुरत असल्याचा किंवा सुजल्याची तक्रार केलीय.
मात्र काहींच्या सांगण्यानुसार लॉकडाउनच्या कालावधीमध्ये जास्त काळ मोबाईलवर वेळ घालवल्यामुळे डोळे चुरचुरण्याचं लक्षण दिसून येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page