वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील उमाळा परिसरात स्वच्छता मोहीम..

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील उमाळा परिसरात स्वच्छता मोहीम..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा परिसर आज स्वच्छता कार्यक्रम राबवून परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला.वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाधवडे येथील बारमाही राहणाऱ्या उमाळ्याला दर दिवशी अनेक पर्यटक भेटी देतात. नैसर्गिकरित्या वाहणारे हे उमाळे येथील वाढलेल्या गवत व शेवाळामुळे दिसत नव्हते.पर्यटकांना त्याचा आनंद घेता येत नव्हता. परंतु वैभववाडी महाविद्यालयातील इतिहास विभागाने पुढाकार घेऊन येथे स्वच्छता कार्यक्रम राबवून हा परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता कार्यक्रमात इतिहास विभागातील श्रुती धनावडे, आकांक्षा इंदुलकर, माधुरी पालकर,प्रणाली साळुंखे, सुरज पाटील, दिपक पावसकर, सागर तांबे, प्रमोद वारीक, क्षितीज वाडेकर, उत्तम गवस व विशाल सावंत हे आजी-माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इतिहास विभाग प्रमुख व माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे सचिव प्रा.एस. एन. पाटील यांनी केले होते.

अभिप्राय द्या..