पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना..

पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना..

 

रत्नागिरी /-

 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत. स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुण्यातील औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह १४ पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आले होते. हे पर्यटक आज (१८ डिसेंबर) दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले.

ही घटना किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांच्या निर्दशनास आली. त्यामुळे तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. बुडालेल्या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा यावेळी बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या तीन तरुणांना सध्या दापोली येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हे तरुण बुडाल्याचं दिसून येताच स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्यांना फक्त तिघांचेच प्राण वाचण्यात यश आलं. इतर तीन पर्यटक तोपर्यंत पाण्यात बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध स्थानिक घेत होते. या घटनेची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली. त्यानंतर बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध घेण्यात आला. काही वेळाने हे तिघांचेही आढळून आले.

अभिप्राय द्या..