डोंबिवली एमआयडीसीतल्या शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग

डोंबिवली एमआयडीसीतल्या शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग

अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल

डोंबिवली एमआयडीसी फेज वन भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या कंपनीला भीषण आग लागली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या खंबाळपाडा भागात ही कंपनी आहे. शक्ती प्रोसेस ही कपड्याची कंपनी आहे. त्यामुळे या आगीने भीषण रुप धारण केलं आहे. ही आग नेमकी का लागली? हे स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या पाच ते साह गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

डोंबिवली पूर्व एमआयडीसी फेज वन मधील असलेल्या शक्ती प्रोसेस कपडा कंपनीला संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. फायर ब्रिगेड सात गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी सोनारपाडा गोदामाला आग लागली होती. सातत्याने डोंबिवलीत आग लागण्याची घटना घडली. बेकायदा भंगार गोदाम आणि केमिकल कंपन्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

 

 

अभिप्राय द्या..