वेंगुर्ला – रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने “सबला” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गावातील महिलांना व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदूर्ग झोनचे असिस्टंट गव्हर्नर रोट.प्रणय तेली ,झोनल रोटरॅक्ट रिप्रेझेंनटेटिव्ह रोट.स्वप्निल परब, डिस्ट्रिक्ट हेल्थ डिरेक्टर रोट.राजेश घाटवळ , प्रमुख वक्ते म्हणून होमिओपेथीक मेडिकल कॉलेजच्या डॉ.पूजा कर्पे मॅडम,परबवाडा सरपंच पपू परब, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे क्लब अॅडव्हाझर रोट.नितीन कुलकर्णी ,रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन चे प्रेसिडेंट रोट.अभिषेक साळगावकर, सेक्रेटरी रोट.निहार साळगावकर, इव्हेंट चेअरमेन रोट.साहिली निनावे,रोट.नेहा गावडे, रोट.प्रितीश लाड, रोट.शुभम हुले, रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्रेसिडेंट रोट.निहाल नाईक, व्हाईस प्रेसिडेंट रोट.दुर्गेश पाटिल तसेच इनरव्हिल क्लबच्या प्रेसिडेंट गौरी मराठे, पास्ट प्रेसिडेंट वृंदा गवंडळकर आदी उपस्थित होते.
तसेच परबवाडा गावचे उपसरपंच संतोष सावंत, माजी उपसरपंच संजय मळगावकर, माजी सभापती सारिका काळसेकर, आरोग्य सेविका आंबेरकर , ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, सखी पवार, ग्लानेस फर्नांडिस, अर्चना परब, कृतिका साटेलकर, ग्रामसंघ अध्यक्ष नयना सावंत, सचिव दर्शना परब, C.R.P. गौरी सावंत व अॅना डिसोझा आदी उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाला रोट.राजेश घाटवळ , रोट.प्रोफे.डॉ.वसंतराव पाटोळे , रोट.दादा साळगावकर व सीमा नाईक यांचे सहकार्य लाभले.
ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोट.साहिली निनावे यांनी तर आभार रोटरॅक्टर तथा ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत परबवाडाचे कर्मचारी राजा परब व सिद्धेश कापडोसकर यांचे सहकार्य लाभले.