मुंबई : बऱ्याचदा स्त्रिया आपल्या आरोग्याच्या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. जर आपण वाढते वजन, चेहऱ्यावर मुरुम किंवा नको असलेल केस, तसेच मासिक पाळीची अनियमितता यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असाल, तर वेळीच सावधगिरी बाळगा. ही लक्षणे ‘पीसीओडी’ या आजराची सुरुवात देखील असू शकतात. पीसीओडी हा असा आजार आहे, ज्यामुळे आपल्याला वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
देशातील दहा टक्के महिला पीसीओडीमुळे त्रस्त!
एका संशोधनानुसार, सध्या हा आजार स्त्रियांमध्ये खूप वेगाने पसरत आहे. देशभरातील सुमारे 10 टक्के महिला या आजाराने ग्रस्त आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यापैकी सुमारे 50 टक्के महिलांना आपल्याला हा आजार झालाय, याची कल्पनाच नाहीय.

पीसीओडी म्हणजे काय?
Polycystic Ovarian Disease (PCOD)  हा आजार Polycystic Ovary syndrome (PCOS) म्हणूनही ओळखला जातो. पीसीओडी आजार ही एक हार्मोनल समस्या आहे. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे म्हणजेच हार्मोनल इमबॅलेन्समुळे महिलांच्या अंडाशयात लहान लहान गाठी तयार होतात. ज्यामुळे महिलांचा अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो आणि गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवतात.

ही प्रमुख लक्षणे
– वजन वाढवणे

– अनियमित मासिक पाळी

– अति रक्तस्त्राव

– चिडचिड

– मूड स्विंग

– चेहऱ्यावर केस

– मुरुमे

या समस्येचे नेमके कारण…
या समस्येचे नेमके कारण आतापर्यंत समोर आले नाही. परंतु, अनियमित जीवनशैलीचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. रात्री उशिरापर्यंत जगणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, जास्त ताणतणावाखाली राहणे इत्यादी कारणांमुळे पीसीओडी होऊ शकतो. कधीकधी ही समस्या आनुवंशिकतेमुळे देखील उद्भवू शकते.

सोनोग्राफी करणे आवश्यक…
यापैकी काही लक्षणे दिसत असल्यास, डॉक्टर रुग्णाची सोनोग्राफी करुन घेतात. आवश्यक असल्यास, रक्त चाचणी आणि काही हार्मोनल चाचण्या देखील केल्या जातात. अहवालाच्या आधारे पीसीओडीची पुष्टी केली जाते.

पीसीओडीवर उपाय
पीसीओडी हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. यासाठी जीवनशैलीत सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. यासाठी हाय कोलेस्ट्रॉल, हाय फॅट आणि हाय कार्बोहायड्रेट युक्त आहार टाळा. दररोज एक तास नियमित व्यायाम करा. यामुळे वजन नियंत्रित राहील. तसेच डॉक्टरांनी काही औषधे दिली असतील तर, ती वेळेवर घ्या. याद्वारे पीसीओडीची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page