लग्नात दारू दिली नाही म्हणून नवऱ्याची भोसकून हत्या!

लग्नात दारू दिली नाही म्हणून नवऱ्याची भोसकून हत्या!

याप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून इतर पाच आरोपी फरार झाले आहेत.
लग्न म्हटलं की नाच-गाणं आलंच. मात्र आता त्याच नाच गाण्यात दारू पिऊन धिंगाणा घालण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. पण एका लग्नाच्या भर मंडपात नवऱ्याच्या हत्येच कारण ही दारू ठरली आहे. लग्नात दारू मिळाली नाही म्हणून मित्रांनी नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश जिल्ह्यातील अलीगढच्या पालीमुकीमपुर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नक्की काय घडले?
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्र पालीमुकीपुर गावात नवरा बबलू (वय २८) च्या लग्नात दारूची सोय झाली नाही. त्यामुळे मित्रांची नवरा बबलूसोबत कडाक्याची भांडणं झाली, नंतर त्याला मारहाण झाली आणि शेवटी मित्रांनी बबलूच्या शरीरात सुरा घुपसला. गंभीर झालेल्या नवरा बबलूला मंडपातून त्वरित रुग्णालयात घेऊन गेले, जिथे काही तासांनंतर त्याचा मृत्यू झाला.

मुख्य आरोपी अटकेत, इतर पाच जण फरार
पोलिस विभागीय अधिकारी नरेश सिंहने आज (बुधवारी) सांगितले की, ‘या घटनेतील मुख्य आरोपी नरेंश सिंहला अटक केली गेली आहे. तर बाकीचे पाच इतर आरोपी फरार झाले आहेत.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे आणि लवकरच इतर आरोपींना अटक करण्यात येईल.’

 

अभिप्राय द्या..