भाभा अणु संशोधन केंद्रात तरुण संशोधकांसाठी १०५ ज्युनिअर रिसर्च फेलोशिपची संधी आहे…
 
BARC Recruitment 2020: भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत भाभा अणु संशोधन केंद्राने (बीएआरसी) फिजिक्स, केमिकल आणि जैवविज्ञान क्षेत्रातील पात्र आणि उत्साही तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने १०५ फेलोशिपची घोषणा केली आहे. सोमवारी, १४ डिसेंबर २०२० रोजी केंद्राने यासंदर्भात जाहिराती दिली होती. यानुसार, विविध क्षेत्रातील ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार बीएसआरसीच्या barc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया १८ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे आणि १५ जानेवारी २०२१ पर्यंत उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतील.

कोण अर्ज करू शकेल?

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून किमान ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. मात्र, या उमेदवारांना निश्चित तारखेपर्यंत गुणपत्रिका द्याव्या लागतील. याव्यतिरिक्त, अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया

स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांच्या शैक्षणिक कामगिरी आणि गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्क

अर्जाचे शुल्क ५०० रुपये आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी भरली जाऊ शकते.
फेलोशिप आणि इतर सुविधा

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३१ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल. फेलोशिपचा कालावधी दोन वर्षे असेल. ज्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांना पुढील तीन वर्षांसाठी सिनिअर रिसर्च फेलो (एसआरएफ) म्हणून बढती दिली जाईल. एसआरएफ दरम्यान दरमहा ३५ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल. याव्यतिरिक्त, दरवर्षी ४० हजार रुपयांचे आकस्मिक अनुदान दिले जाईल. तसेच, उमेदवारांना वैद्यकीय सुविधा सीजीएचएस अंतर्गत देण्यात येईल. त्याच वेळी, उपलब्धतेच्या आधारे निवास सुविधा दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page