वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामपंचायत आवारातील हायमास्टचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.रेडी येथील या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ, पं.स.सदस्य मंगेश कामत, सरपंच रामसिंग राणे, ता.चिटनीस समीर कुडाळकर, आनंद शिरवलकर, मंदार नार्वेकर, अमित गावडे, प्रणव वायंगणकर व रेडी गावातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.