व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन..
कोल्हापूर /-
स्वराज्य निर्माण संस्थेचे अध्यक्ष संदिप बोटे यांचे कार्य समाजातील युवकांना प्रेरणादायक आहे.कोरोणा काळात समाजातील आशावर्कर, पोलिस कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांना केलेले अनमोल सहकार्य उल्लेखनीय आहे.असे वक्तव्यपाटोदा( औरंगाबाद) आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले .समाजाच्या अपेक्षा खूप कमी असतात. त्याही द्यायला आम्ही
कमी पडतो. आपण लोकांकडूनच कराद्वारे पैसे घेतो;मग सुविधाका देत नाही? यश, ध्येय गाठण्यासाठी व तळागाळातील माणसांचे कल्याण करण्यासाठी कधी-कधी दोन पाय मागे घेता आले पाहिजेत, तरच गावचा विकास निश्चित होईल. सरंपचानी गावातील विकासासाठी सुसंवाद साधावा .
मुरगूड (ता. कागल) येथे अवचितवाडी (ता. कागल)येथील स्वराज्य निर्माण संस्थेचे संस्थापक संदीप बोटे यांच्या,पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘आपला गाव, आपला विकास’या विषयावर पाटोदा आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच, व्याख्याते,भास्करराव पेरे-पाटील अनुभव व्यक्त करत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्य करिअर अॅकॅडमीचे संस्थापक लक्ष्मीकांत हांडे होते. यावेळी कोरोना काळात काम केलेल्या सरपंच, ग्रामपंचायत, नगरपरिषद व आशा वर्कर्स यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुरगूड पोलीस ठाण्याचे सपोनि विकास बडवे, कोजिमाशिचे संचालक एच.आर. पाटील, तुकाराम पाटील, सुभाष भोसले, विशाल कुंभार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विजय जाधव यांनी मानले .