कुडाळ /-

लाँगडाऊन कालावधीतील देखरेखीसाठी ठेवलेलेल्या महिलेने घरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची घटना ही घटना पावशी येथे घडली आहे.लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये देखरेखीसाठी ठेवलेल्या महिलेने हे आपलेच घर आहे. तुमच्या इथे काही संबंध नाही. असे सांगत घरमालकाने लावलेले कुलूप तोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मालकांना शिविगाळी करून मारण्यासाठी अंगावर धावून गेल्या प्रकरणी एका महिलेस तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना आज मंगळवारी सकाळी ११ वा पावशी मिटक्याचीवाडी येथे घडली आहे.

यातील रजनी श्रीधर सावंत याचे पावशी तवटेवाडी येथे सामाईक घर आहे.सद्यस्थितीत ते व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतात. दरम्यान त्यांनी देखरेखीसाठी सौ विनिता लक्ष्मण मेस्री (३५) हिला ठेवले होते.कोरोनामुळे सावंत व त्यांचे कुटुंबीय गावी आले नव्हते.यानंतर सावंत हे मंगळवारी आपल्या घरी आले. यावेळी लक्ष्मण विठ्ठल मेस्त्री (६०),सौ विनिता लक्ष्मण मेस्त्री, व संजय लक्ष्मण मेस्री यांनी त्याठिकाणी जाऊन सावंत यांच्या घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला.सावंत यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली व सावंत यांचा भाचा गुरुदत्त प्रभू यांच्या अंगावर हातोडा घेऊन मारण्यासाठी गेले.व घरात जाऊन धमकी दिली. याप्रकरणी लक्ष्मण विठ्ठल मेस्त्री (६०),सौ विनिता लक्ष्मण मेस्त्री, व संजय लक्ष्मण मेस्री या तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या तिघांनी पोलिसांनी दिलेली नोटीस स्विकारली नाही.तसेच पोलिसांशी हुज्जत घातली. यानंतर पोलिसांनी यातील लक्ष्मण विठ्ठल मेस्त्री (६०) व संजय लक्ष्मण मेस्री यांना तात्काळ अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page