कणकवली विधानसभा मतदारसंघात नांदगाव येथे उपक्रम
युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने कै.देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शाखा नांदगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरामध्ये १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, महिला जिल्हा प्रमुख निलम पालव , युवा नेतृत्व संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम तसेच युवासेना विस्तारक अमित पेडणेकर यांच्या सूचनेनुसार हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव , युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी या शिबिराला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू म्हणाले, सध्या संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. आणि म्हणूनच रक्तदान शिबीर आयोजित करुन तो तुटवडा भरून काढणे हि आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण हे रक्तदान शिबिर युवासेनेच्या वतीने आयोजित केले आहे. आपण मिळून अशी परिस्थिती निर्माण करू शकतो की गरजू रुग्णांना रक्ताची वाट पहावी लागणार नाही. त्यासाठी गरज पडेल तेव्हा आपण असे रक्तदान शिबीर आयोजित करूयात. आपल्या देशात सुमारे दहा लाख थॅलेसेमियाग्रस्त मुलं आहेत ज्यांना दर १५ दिवसांनी रक्त चढवावं लागतं. आपल्या जिल्ह्याचं म्हणाल तर अशी १८ मुलं सिंधुदुर्गात आहेत. तुमचं रक्तदान हे त्यांच्या आयुष्यासाठी १५ दिवस जोडणारे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाय हिमोफेलीया, सिकलसेल्स, ब्लड कॅन्सर असे रक्ताचा आजार असणारे अनेक रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आपण केलेलं रक्तदान हेच त्यांचे जीवन आहे असे गीतेश कडू यांनी सांगितले.
नीलम पालव म्हणाल्या, एखाद्या दात्याने रक्तदान केल्यावर जसा त्याचा रुग्णाला फायदा होतो. तसाच फायदा हा रक्तदात्याला सुद्धा होतो. यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचविता येतो. गीतेश कडू, राजू राठोड यांच्या नेतृत्वाखाली कणकवली देवगड वैभववाडीत युवासेनेचे उत्कृष्टकाम सुरु आहे. रक्तदानाचा उपक्रमही स्तुत्य असल्याचे नीलम पालव यांनी सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर, शाखाप्रमुख राजा म्हसकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर,तेजस राणे निनाद देशपांडे, आबू मेस्त्री, उत्तम ओटवकर, सुनील पवार, सुरेश मेस्त्री, संदीप शिंदे, प्रफुल्ल तोरसकर, समीर कुंभार, आनंद म्हसकर, अवधूत नार्वेकर, सारिका खरात, माधवी दळवी, सुप्रिया खडपे, गणेश बांधिवडेकर, तात्या निकम, जीजी खडपे, संजय नाडकर्णी, लक्ष्मण लोके, दीपक कांडर, अब्दुल पाटणकर, अब्दुल नावळेकर, गवस साटविलकर,रज्जाक बटवाले आदी उपस्थित होते.