मालवण /
टोपीवाला प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता श्रीकांत सावंत (वय-७२) यांचे आज रत्नागिरी येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
टोपीवाला प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सावंत या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जायच्या. त्या स्मितभाषी, मनमिळावू स्वभावाच्या होत्या.
१९७३ मध्ये त्या प्राथमिक सहायक शिक्षिका म्हणून सेवेत रुजू झाल्या होत्या तर १९९३ पासून त्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत होत्या.नियत वयोमानानुसार २००६ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यानंतर त्या रत्नागिरी येथे स्थायीक झाल्या होत्या. आज त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.