मसुरे 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने इ. ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन ०३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:०० ते ११:४५ या वेळेत करण्यात आले आहे.स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे.
स्पर्धा इ. ३ री ते ८वी इयत्तेनुसार ६ गटात घेण्यात येनार आहे.प्रत्येक गटातून प्रथम ३ क्रमांक काढण्यात येणार असून प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे
१००१रुपये व चषक, ७५१रु, ५०१ रु व प्रत्येकी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा ऑनलाइन परीक्षा या स्वरूपात होईल.
विद्यार्थी आपल्या सोयीनुसार कॉम्प्युटर/ लॅपटॉप/ मोबाईल/ टॅब्लेट वर परीक्षा देऊ शकतील. वेळेपूर्वी फॉर्म भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्या नंतर आपल्याला त्या त्या इयत्तेच्या व्हाट्सएप ग्रुप च्या लिंक दिसतील. त्यातील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करून त्याच इयत्तेच्या ग्रुपला जॉईन झाल्यावरच आपल्याला स्पर्धेत सहभागी होता येईल. गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्याची अंतिम दिनांक २७ डिसेंबर आहे.
अधिक माहितीसाठी
श्री. विनीत देशपांडे(9421859850), श्री.दिनकर शिरवलकर(9404743966),,श्री. कृष्णा कालकुंद्रीकर (9420355139) येथे संपर्क साधा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर टच करून फॉर्म भरावा.
https://forms.gle/xmG7xjSBws919DY46
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन
महा.राज्य प्राथ.शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page