मनसे कुडाळ तालुक्याची मासिक बैठक संपन्न.;नेरूर व बिबवणे येथील ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश..

मनसे कुडाळ तालुक्याची मासिक बैठक संपन्न.;नेरूर व बिबवणे येथील ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश..

 

 

आगामी ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याची आढावा बैठक सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 14 डिसेंबर रोजी कुडाळ येथे संपन्न झाली.सदर बैठकीस पक्षाचे सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी जिल्हा सचिव, मनविसे जिल्हाध्यक्ष आदींसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

या बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बिबवणे व नेरूर गावातील ग्रामस्थांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला. यामध्ये भूषण परब, संतोष भगत,श्रीपाद अडसुळे, चिन्मय नाडकर्णी, अक्षय जोशी, प्रथमेश ठाकूर, रमेश जोशी, अक्षय माधव यांसह ग्रामस्थांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.भूषण विष्णू परब यांना नेरूर पंचायत समिती विभाग अध्यक्ष, रमेश जोशी नेरूर शाखाध्यक्ष, प्रथमेश ठाकूर नेरूर विद्यार्थी सेना शाखा अध्यक्ष, अक्षय माधव नेरूर उपशाखा अध्यक्ष, श्रीपाद अरविंद अडसुळे बिबवणे विभाग अध्यक्ष अशी पदांची जबाबदारी देण्यात आली.त्याचबरोबर कुडाळ तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष म्हणून गुरू मर्गज,उप जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना (कुडाळ-मालवण) पदी हितेंद्र काळसेकर यांची निवड करण्यात आली.

अभिप्राय द्या..