विद्या मंदिर नाधवडे नवलादेवीवाडी, ब्राह्मणदेववाडी प्रशालेच्या मंजूर असलेल्या शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, पं. स. सभापती अक्षता डाफळे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, बाप्पी मांजरेकर, बंड्या मांजरेकर, गटविकास अधिकारी विद्या गमरे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. नदाफ, सूर्यकांत कांबळे, शैलजा पांचाळ, मुख्याध्यापक संजय पाताडे, प्रशासक यशवंत वळवी, ग्रामसेवक एन.डी. नदाफ, बाबा कोकाटे व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. जठार म्हणाले, माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. चे नियोजनबद्ध काम चालू आहे. पालकांनी विद्यार्थ्यांसांठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आग्रह धरु नये. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवले पाहिजे. असे सांगितले. राजेंद्र म्हापसेकर, शारदा कांबळे, सुधीर नकाशे, संजय पाताडे यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा कोकाटे यांनी तर आभार संजय पाताडे यांनी मानले.
फोटो – नाधवडे ब्राह्मणदेववाडी नवलादेवीवाडी प्रशालेच्या शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ करताना माजी सभापती बाप्पी मांजरेकर. यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे सभापती व पदाधिकारी.