महाराष्ट्र राज्यात सध्या मतदार नाव नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल, आक्षेप, हे निवडणूक आयोगाने काम चालू केले असून १५ डिसेंबर पर्यंत ही नोंदणी चालू राहणार आहे
तहसीलदार पातळीवरून याचा आढावा घेण्यात येत असून कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंदार शिरसाट व उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या प्रयत्नाने शक्य होईल त्या प्रमाणात नागरिकांना या नोंदणी संदर्भात मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत असून काल मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी राजकीय पक्षांना केलेल्या आवाहनाला साद देत सहकार्य म्हणून मालवण शहरात भरड परीसरात घरोघरी जाऊन या विषयी माहिती देऊन फॉर्म वाटण्यात आले हे फॉर्म भरून लवकरच तहसीलदार मालवण या ठिकाणी जमा करण्यात येणार असून नवयुवा मतदारांना या बाबत नावनोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले
भारताचे मा.पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी १८ वर्षाच्या युवा तरुणांना हा हक्क प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला होता भविष्यातील देशाचं भविष्य हा युवा मतदार घडवणार असून देशात आपल्या मताचा अधिकार वापरण्याचा हक्क या युवावर्गाला असून एक उत्तम मतदार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ची आवड या बाबत मार्गदर्शन करून या नोंदणी फॉर्म चे वाटप आज मालवण शहरात करण्यात आले

असेच फॉर्म कुडाळ मध्ये देखील वाटो करण्यात येणार असून या फॉर्म भरण्याबाबत ची माहिती हवी असल्यास 9892055820 या मोबाईल नंबरशी संपर्क करावा

घरोघरी हे फॉर्म वाटप करताना पल्लवी तारी यांसोबत काँग्रेसचे जिल्हासचिव बाळू अंधारी, अरविंद मोंडकर, युवा जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, मालवण शहर युवाअध्यक्ष गणेश पाडगावकर, सरदार ताजर, प्रभाकर हेदूळकर, तालुकायुवाध्यक्ष अमृत राऊळ, युवक जिल्हा सचिव योगेश्वर कुरले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page