कुडाळ/-
कुडाळ पंचायत समितीच्या वतीने प्रशासन आणि लोक सहभागातून तब्बल एक हजार एक्याऐंशी (१०८१) बंधारे बांधण्यात आले.गेली तीन वर्ष कुडाळ पंचायत समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या लोकचळवळीच कौतुक केलं आहे. कुडाळ तालुक्यात पावशी आणि नेरूर इथं या मोहिमेचा शुभारंभ डॉ. हेमंत वसेकर यांच्या हस्ते आज झाला. संपूर्ण महाराष्ट्रात असा उपक्रम गेली तिन वर्षे राबवून कुडाळ पंचायत समितीने एक नविन उच्चांक प्रस्थापीत केला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी श्रीफळ वाढवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती नूतन आईर, उप सभापती जयभरात पालव, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, माजी सभापती राजन जाधव, गट विकास अधिकारी विजय चव्हाण, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, माजी सरपंच पप्या तवटे, उपसरपंच दीपक आंगणे, सहाय्यक बीडीओ मोहन भोइ, ल.पा विभागाचे विवेक नानल, आर. जी. चोडणकर, कृषी अधिकारी प्रफुल वालावलकर, बाळकृष्ण परब, सखाराम सावंत, दत्ताराम आंबेरकर, महादेव खरात, मंदार पाटिल, अमित देसाई, तसेच नेरूरच्या कार्यक्रमाला नेरूर सरपंच शेखर गावडे, उपसरपंच समद मुजावर, केंद्र प्रमुख भिकाजी तळेकर, ग्रा.प.सदस्य पं.स.कर्मचारी ग्रामविकास अधिकारी सरिता धामापूरकर तसेच वासूदेव कसालकर, प्राथमिक शिक्षक तसेच अंगणवाडी कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कुडाळ तालुक्याच्या या उपक्रमाचं अनुकरण अन्य तालुक्यानी सुद्धा केलं पाहिजे असं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी सांगून उपक्रमाचं विशेष कौतुक केलं. नेरूर वसुसेवाडी इथं सुद्धा बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्याचा शुभारंभ सुद्धा डॉ. हेमंत वसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. कुडाळ पंचायत समितीच्या या ऊपक्रमाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई आणि सभापती नूतन आईर यांनी अभिनंदन केलं. कोणताही शासकिय निधी उपलब्ध नसताना कुडाळ तालुक्यात निव्वळ लोकसहभाग व श्रमदानातून या दिवशी १०८१ बंधारे बांधण्यात आले. यामध्ये ४७० वनराई, ४१४ कच्चे, ४६ विजय व १५१ खरी बंधारे बांधण्यात आले. या कामासाठी पंचायत समितीचे सर्व प्रशासकीय विभाग आणि लोकांचे चांगले सहकार्य लाभल्याचं गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितलं.