आचरा केंद्र शाळे च्या अद्ययावत संगणक कक्षाचे उदघाटन

आचरा केंद्र शाळे च्या अद्ययावत संगणक कक्षाचे उदघाटन

 

आचरा

जिल्हा परिषद आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातील तीनशे शाळांमध्ये निवड झालेल्या केंद्र शाळा आचरे नं १ साठी स्मार्ट सिटी चॅरीटेबल ट्रस्ट संचलित रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर कडून आचरा गावचे सुपुत्र कोल्हापूर येथील उद्योजक कै. हेमंतजी हरीश्चंद्र दुखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अद्यावत “संगणक कक्ष ” दिला या संगणक कक्षाचे उद्घाटन आचरा गावाच्या प्रथम नागरिक सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते केला गेला. या वेळी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी व दुखंडे कुटूंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.

7 संगणक, स्कॅन र, प्रिंटर, तसेच लागणारे साहित्य व अद्यावत सुशोभित केलेला संगणककक्ष रोटरीक्लब कोल्हापूर यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला. या संगणक कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरचे पदाधिकारी अविनाश पाटील, विनायक भालेकर, गजानन पाटील, मनोज गुरव, नंदू कशाळकर, सुरेश मोरे, दुखंडे कुटूंबातील जेष्ठ सदस्य आबा दुखंडे, राजू दुखंडे, साहित्यिक सुरेश ठाकूर, प स सदस्य निधी मुणगेकर, प्रमोद वाळवेकर, तात्या भिसळे, प्रकाश पेडणेकर, जयप्रकाश परुळेकर, सचिन दुखंडे, सायली दुखंडे, अर्जुन दुखंडे, विभावरी दुखंडे , केंद्रप्रमुख सुगंधी गुरव, मुख्याध्यापिका श्रीमती स्मीता जोशी तसेच इतर शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे नितीन घाडी व इतर पदाधिकारी, पालकवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त करताना सरपंच टेमकर म्हणाल्या की आचरा गावचे सुपुत्र कोल्हापूर येथील उद्योजक कै. हेमंत दुखंडे यांना नेहमी आचरा गावाविषयी प्रेम होते ओढ होती त्यांचा गावहिताच्या कामात नेहमी सहभाग होता. आज शालेय शिक्षण घेताना संगणकीय शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. केंद्र शाळेत आज आचरा पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षण घेऊन घडत आहे हे विद्यार्थी संगणकीय शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कै. हेमंत हरीश्चंद्र दुखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “संगणक कक्ष ” निर्माण करण्याचे कार्य रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर व दुखंडे कुटूंबीय यांनी केले आहे. याचा लाभ या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला होणार आहे. या त्यांच्या कार्यासाठी आचरा गावाच्या वतीने रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर व दुखंडे कुटूंबीय यांचे आभार मानत असल्याचे त्या म्हणाल्या.

अभिप्राय द्या..