राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदश्चंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात दिनांक १२ ते २० डिसेंबर या कालावधीत वाढ दिवस सप्ताह साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाभर भरगच्च विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व तालुका अध्यक्षाची बैठक दिनांक ८/१२/२०२० रोजी पक्ष कार्यालय कुडाळ येथे संपन्न झाली.

महाराष्ट्रात प्रथमच पवार साहेबांचा वाढदिवस व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून होणार असून मा.खा.शरदश्चंद्रजी पवार साहेब यावेळी स्वःता महाराष्ट्रातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.त्यामूळे सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील जनतेला त्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै.काॅलेजच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार मा.विनायकजी राऊत.आमदार मा. दिपक केसरकर.आमदार मा.वैभवजी नाईक.जिल्हा बॅन्क अध्यक्ष मा. सतीश सावंत.राष्ट्रीय काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.चंद्रकात उर्फ बाळा गावडे. शिवसेना जिल्हाप्रमुख मा.संजयजी पडते. संदेश पारकर.यांचेसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहून सहभाग घेणार आहेत.
या बैठकीत तालुकावार नियोजन करण्यात आले.त्यानुसार १२ डिसेंबरला कुडाळ एमआयडीसी येथील बॅ.नाथ पै काॅलेज सभागृहात व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम सकाळी ९-४५ ते दुपारी २-३० पर्यंत आयोजित केला असून.१३ डिसेंबरला देवगड व वैभववाडी येथे वृक्ष वाटप.१५ डिसेंबरला कणकवली फोंडा येथे रक्तदान शिबीर. १६ डिसेंबरला वेंगूर्ला येथे निबंध स्पर्धा. मालवण येथे रोगनिदान शिबीर.तसेच या वाढदिवस सप्ताहाचा समारोप कार्यक्रम सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात दिनांक २० डिसेंबरला विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येईल.असे नियोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर. बाळ कनयाळकर. शिवाजी घोगळे. भास्कर परब.अनंत पिळणकर मालवण तालुका अध्यक्ष डाँ, विश्वास साठे. देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव. कणकवली तालुकाअध्यक्ष राजू पावस्कर. वैभववाडी तालुकाध्यक्ष रविन्द्र चव्हाण . वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर.सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.उत्तम सराफदार.देवेन्द्र टेमकर. नवल साटेलकर.सर्फराज नाईक. नझीर शेख.संग्राम सावंत.सुंदर पारकर.इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page