कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची ग्रामदेवता श्री देवी आंदूरलाई मातेचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020 रोजी संपन्न होत आहे.तरी सालाबादप्रमाणे सकाळी श्रींचे विधिवत पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले होणार असून वार्षिक भेटीचे नारळ अर्पण करणे,नवस फेडणे,ओट्या भरणे आदी कार्यक्रमांस सुरुवात होणार आहे. रात्री 9 वाजता वाजत गाजत श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार असून 11.30 वाजता चेंदवणकर गोरे दशावतार(मालक – सुधाकर दळवी) नाट्यमंडळाचे दशावतार नाटक होणार आहे. तरीही सर्व भाविकांनी जबाबदारीपूर्वक कोरोना विषयक नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ,आंदुर्ले ग्रामस्थ आणि इर्तिक मंडळी आंदुर्ले यांच्या वतीने करण्यात आले आहे.