कुडाळ /-
नारुर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आदम शहा यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी यांना कार्यालयात शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा नाही.आणि नवीन फोटो खरेदी करायचा नाही असे सांगितल्याने शिवप्रेमी व सकल मराठा समाजाकडून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, मराठा क्रांती मोर्च्याचे जिल्हा समन्व्यक ऍड सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज नारुर ग्रामपंचायतला धडक देत ग्रामसेवकाला धारेवर धरले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल असे अनुदगार काढलेले कदापि सहन करणार नाही असे ठणकावत ग्रामसेवकांना माफी मागायला लावून त्यांच्या हस्ते नवीन शिवप्रतिमा कार्यालयात लावून घेतली . ग्रामसेवक यांनी आपली चूक कबूल करून समस्त शिवप्रेमी,सकल मराठा समाजाची जाहीर माफी मागून अशी पुन्हा चूक होणार नाही असे सांगितले. त्या वेळी मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश म्हाडगुत, बंड्या सावंत, दीपक नारकर, संध्या तेरसे, भाऊसाहेब महाडदेव,सूर्यकांत नाईक, शैलेश घोगळे, नंदकिशोर सरनोबत, आबा कुणेकरकर, नरेंद्र राणे, परब, मेस्त्री,तळेकर, लाक्षिमीकांत राणे, रमा नाईक, किशोर सरनोबत,संतोष परब, नारुर उपसरपंच प्रशांत बोडेकर उपस्थित होते.