जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.;जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा निर्णय..

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.;जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा निर्णय..

 

सिंधुदुर्गनगरी /-

बुद्धिष्ट सोयायटी आॅफ इंडिया व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे १० नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. याकडे प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर २७/११/२० पासून घंटानादसह ढोल, ताशा, बैंजो वाजवण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला होता त्यासाठी ओरोस प्रभारी अधिकारी सिंधुदुर्ग नगरी आणि अमोल फाटक तहसीलदार कुडाळ यांच्या कडे पाठपुरावा करून ही आजपर्यंत परवानगी दिली नाही. अखेर पोलिस, कलेक्टर, जिल्हा परिषदेकडून न्याय मिळेपर्यंत घंटानाद आंदोलन सुरू च ठेवणार तरीही न्याय मिळाला नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सोमवारपासून मरेपर्यंत उपोषण करणार असल्याचे यादव यांनी सांगितले

अभिप्राय द्या..