रेश्मा परुळेकर वय वर्ष ५५ राहणार तेंडोली तालुका कुडाळ या मागील काही वर्षांपासून हिप जॉईंटच्या वेदनांनी त्रस्त होत्या या किरकोळ दुखण्याकडे सुरुवातीला रेश्मा परुळेकर यांनी दुर्लक्ष केले, मात्र वेदना असह्य झाल्यामुळे रेश्मा परुळेकर यांना नातेवाईकांनी २२ नोव्हेंबर २०२० रोजी एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले, सर्व रिपोर्ट पाहता एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल मधील अस्थिरोग विभागातील अस्थिरोगतज्ञ डॉ. अजयकुमार अल्लमवार (एम.बी.बी.एस., एम.एस. अस्थिरोगतज्ञ) यांच्या असे निदर्शनास आले की हिप जॉईंट पूर्णपणे खराब झाल्यामुळे या असह्य करणाऱ्या वेदना होत होत्या रेश्मा परुळेकर यांच्या कुटुंबीयांनी  हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला म्हणजेच रेश्मा परुळेकर यांचे खराब झालेले हिप पूर्णपणे कृत्रिम साधनाच्या साहाय्याने बदलविण्याचे ठरविले.
डॉ. अजयकुमार अल्लमवार (एम.बी.बी.एस., एम.एस. अस्थिरोगतज्ञ) हे सदर शस्त्रक्रिया क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असून यापूर्वीदेखील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली आंशिक गुडघा बदलणे (Partial knee replacement) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत अवघ्या दुसऱ्या दिवशी रुग्णाला कोणत्याही वेदनेशिवाय स्वतःच्या पायावर चालण्यास सक्षम बनवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page