आधुनिक तंत्राने उत्पादन वाढवा; सौ. माधुरी बांदेकर
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा/आत्मा यांच्या वतीने मौजे तळगाव खांद येथे शेतीशाळा कार्यक्रमाचे उदघाटन महिला व बालकल्याण सभापती सौ. माधुरी बांदेकर यांचे हस्ते झाले. यावेळी जी प सदस्य श्री.संतोष साटविलकर, मालवण सभापती श्री.अजिंक्य पाताडे, तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी, उपसरपंच श्री.चव्हाण उपस्थित होते.
यावेळी नारळ पिका विषयी लागवड ते काढणी पश्चात विविध बाबींवर दहा दिवस पंधरा दिवसाच्या अंतराने प्रात्यक्षिक सह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करतांना सौ बांदेकर यांनी अशा स्तुत्य उपक्रमाविषयी आयोजकांना धन्यवाद दिले. अशा उपक्रमांना शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन माहिती घेऊन आपल्या कृषी उत्पादनात प्रगती करावी असे आवाहन केले. संतोष साटविलकर यांनी आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे असे सुचित केले. अजिंक्य पाताडे यांनी मार्गदर्शन करतांना कोरोना सारख्या महामारीच्या काळातही शेतकरी टिकून राहिला. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वाढ होऊन उत्पादनातही वाढ झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी क्रुषि पर्यवेक्षक धनंजय गावडे यांनी केले. कृषी सहाय्यक अम्रुता भोगले यांनी खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या भात पिक प्रात्यक्षिक उत्पन्नाचे आकडेवारी विषद केली व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास होणारी प्रगती बाबत माहिती दिली. यावेळी आत्मा तालुका व्यवस्थापक श्री.निलेश गोसावी, कृषी मित्र श्रीम.लता खोत, ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.