मालवण शहरात भटक्या कुत्र्याचा उपद्रव वाढीस लागला असतानाच काहि दिवसांपूर्वी मालवण शहरातील मॅकेनिकल रोडवर अचानक काही भटके कुत्रे आडवे येऊन झालेल्या मोटारसायकल अपघातात उजव्या पायाला गंभीर दुखापत झालेला सचिन अशोक आजगावकर (रा. देऊळवाडा) या चाळीस वर्षिय तरुणास वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन त्याच्या मित्र परिवाराकडून केले जात आहे. मालवण देऊलवाडा आडारी येथे रहाणारा सचिन आजगावकर हा अपघातात जखमी झाला असून त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी एकूण ८४ हजार रुपयांची आवश्यकता असून त्याच्या मित्र परिवाराने त्याला विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींमार्फत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सचिन हा घरात एकटाच कमावता असून आई, वडील, पत्नी आणि मुलगी असा त्याचा परीवार आहे. सचिनच्या अपघातामुळे आजगावकर कुटुंबिय आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यांना अशा कठीण परिस्थितीत आधार देण्यासाठी 9423302727 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page