वेंगुर्ला /-
आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी ₹, ज्ञानरत्न डाॅ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त भाजपा तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी आदरांजली वाहताना शरदजी चव्हाण म्हणाले की, भारताच्या पावन भुमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे . या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श,मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे.अशा या थोर महापुरुषांत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अभिमानाने घ्यावे लागेल.अशा या महापुरुषास भावपूर्ण श्रद्धांजली.यावेळी वेंगुर्ले न.प नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, किसान मोर्चाचे बाळु प्रभु, बुथप्रमुख शेखर काणेकर,वायंगणी माजी सरपंच शामसुंदर मुननकर, ता.चिटनीस समीर चिंदरकर, जिल्हा चिटनीस ऍड. सुषमा खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर आदी उपस्थित होते.