वेंगुर्ला/-
मठ शिवाजी चौक ते ठाकूरवाडी बायपास मार्गावरील मोडका पूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजतोय असे समजताच मठ उपसरपंच निलेश नाईक यांनी या वृत्ताची दखल घेऊन प्रशासकीय मदतीची वाट न पाहता सहकाऱ्यांबरोबर घेऊन या मोडक्या पुलाची तात्पुरती डागडुजी केल्याने वाहनचालकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मठ गावातील मोडके पूल पुर्णतः खड्डेमय होऊन धोकादायक बनलेले होते. पुलावरील रस्त्याची मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, मठ उपसरपंच निलेश नाईक, साईल धावडे, रघुनाथ बोवलेकर, अरविंद बागायतकर, भाऊ बागायतकर, सूर्यकांत होडावडेकर, संतू बागायतकर, बाबल होडावडेकर, आनंद होडावडेकर, शिवाजी ठाकूर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन श्रमदानाने खड्यांमध्ये माती घालून डागडुजी केली.