कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण..
मसुरे /-
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्त कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने दिला जाणारा मुक्ता साळवे गुणवंत पुरस्कार देवगड तालुक्यातील मुटाट येथील कोमल भरत साळुंके (बारावी विज्ञान शाखा ) हिला जिल्हा अध्यक्ष किशोर कदम ;जिल्हा सरचिटणीस विकास वाडीकर महिला संघटक नेहा कदम , निवड समितीचे अध्यक्ष ,संदीप कदम ,देवगड तालुका अध्यक्ष सूर्यकांत साळुंके, सरचिटणीस विद्यानंद शिरगावकर सहसचिव संतोष शिरसागर अमिष साळुंके यांच्या उपस्थितीत तिचे आई-वडील भरत साळुंके व भाग्यश्री साळुंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला .सन्मानपत्र व रोख रक्कम व ‘युगानुयुगे तूच’ हा दीर्घ काव्यसंग्रह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष किशोर कदम म्हणाले, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे सुरू करून गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याची अभिनव कल्पना मांडून शिक्षणाद्वारे स्त्रियांच्या हक्काला वाचा फोडली .याच शाळेत प्रवेश घेऊन मुक्ता साळवे या कष्टकरी ,शोषित, श्रमिक वर्गातील मुलीने शिक्षणाची अभिरुची वाढवून शिकण्यास प्रेरित झाली .तत्कालीन विषमतावादी समाज व्यवस्थेला छेद देणारा निबंध सादर करून तथाकथित बुद्धिवंतांना आणि समाजाला जागृत केले, दृष्टी दिली. तिच्या धाडशी वृत्तीचे राणी विक्टोरिया आणि राजपुत्राने ही कौतुक केले. अशा या गुणी होतकरू मुलीच्या नावाने मुटाट मधील कोमल साळुंके हिला हा पुरस्कार देऊन सन्मान करीत आहोत. पालकांची बेताची परिस्थिती कोणत्या प्रकारचे कोचिंग क्लासेस नसतानाही स्वकष्टाने तिने मिळवलेल्या यशाचे कौतुक करून तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यावेळी कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विजय जाधव, कणकवली महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम यांनीही शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले व मार्गदर्शन केले तसेच कोमल हिने मुक्ता साळवे प्रमाणेच जिद्दीने कष्ट आणि पुढील शिक्षण पूर्ण करून समाज सेवेसाठी आणि इतर मुलांसाठी प्रेरक कार्य करण्याचे आश्वासन दिले. तिचे पालक भरत साळुंके यांनी देखील पुरस्कारा प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विकास वाडीकर,नेहा कदम संदीप कदम सूर्यकांत साळुंखे संतोष क्षीरसागर विद्यानंद शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील कृष्णा साळुंके, शिवराम साळुं के, परशुराम साळुंके असे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सूर्यकांत साळुंके यांनी केले तर आभार अमिश साळुंके यांनी मानले.