प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण कडून कातकरी कुटुंबांना मदतीचा हात!

प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण कडून कातकरी कुटुंबांना मदतीचा हात!

मसुरे /-

पोईप येथील कातकरी कुटुंबाच्या झोपड्यांना आग लागून तीन कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले होते. प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणने कातकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. या कातकरी गरीब कुटुंबांच्या झोपड्या, कपडे व संसार उपयोगी साहित्य बेचिराख झाले होते. अशा कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी शिक्षक भारती मार्फत तीन कुटुंबांना जेवणासाठी प्रत्येकी दोन टोप,त्यावरील झाकण, प्रत्येकी एक मोठे तपेले, चटया, चमचे, पेले, झोपडया झाकण्यासाठी प्रत्येकी एक मोठी ताडपत्री, प्रत्येकी दोन ब्लॅकेट व कपडे यांचे पोईप येथे जाऊन वाटप करण्यात आले यावेळी कातकरी वस्तीवर जाऊन कातकरी मुलांचे शिक्षण अव्याहतपणे सुरु ठेवल्याबाबत कु रंजना भाटकर हिचे संघटनेमार्फत विशेष कौतुक करण्यात आले यावेळी भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले यावेळी प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे, मालवण तालुकाध्यक्ष श्री. संतोष कोचरेकर, सचिव श्री.संतोष परब, जिल्हा प्रतिनिधी श्री. लहू पारील, महिला आघाडी प्रमुख श्रीम. वैशाली गर्कळ उपाध्यक्ष श्री. प्रमोद पाटील, श्री. संजय जाधव तसेच सुतार हार्डवेअर ओरोसचे मालक दिगंबर सुतार उपस्थित होते.

अभिप्राय द्या..