वेंगुर्ला /-

वेंगुर्ला – तालुक्यातील मठ येथील जागृत देवस्थान श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोनामुळे हा जत्रोत्सव शासनाचे नियम, अटी व शर्थी यांचे पालन करीत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थांनी घेतला आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम, रात्री पालखी प्रदक्षिणा त्यानंतर आजगावकर दशावतारी नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी मास्क लावून व सुरक्षित अंतर ठेवून या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page