धुरीवाडा येथील मनोरुग्णाला टायगर ग्रुपने दिला आधार..

धुरीवाडा येथील मनोरुग्णाला टायगर ग्रुपने दिला आधार..

मालवण/-

मालवण धुरीवाडा येथील मनोरुग्ण शरद नाईक हे जखमी अवस्थेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना सापडले. टायगर ग्रुपचे सदस्य वैभव वळंजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी शरद नाईक यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार होण्यासाठी मदत केली. शरद नाईक हे धुरीवाडा येथे एकटेच राहत असल्याने व त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने टायगर ग्रुपच्यावतीने त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली. या मदत कार्यात अक्षय राजपूत, प्रशांत चव्हाण, मिथुन चव्हाण, मयूर हडकर, राहुल चौकेकर, दिपेश पवार, पुरस्कार चौकेकर, ओरोस प्रमुख हर्षद तरसे, पंकज देसाई, भूषण देसाई यांनी मदत कार्यात सहभाग घेतला.

अभिप्राय द्या..