कुडाळ /-
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील ३५ वर्षीय परप्रांतीय युवक राहुल त्रिभुवन शर्मा याच्यावर बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (पोक्सो कायद्याअंतर्गत ) कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।असून फरार झालेल्या शर्माला कुडाळ पोलिसांच्या पथकाने मुंबईत ताब्यात घेतले आहे.
त्यानंतर कुडाळ येथे शर्माला आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.