वेंगुर्ला /-

फेब्रुवारी २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत आडेली नं १ शाळेच्या कोमल सिताराम लांबर हिने २६२ गुण (९०.९७ टक्के) मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता शिष्यवृत्ती धारक ठरली आहे. तसेच वेंगुर्ले तालुक्यात प्रथम व जिल्हा गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
शाळेचे आठ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल ६२.५० % लागला आहे. यामध्ये कु .समिक्षा सुनिल जाधव 174 (60.4167%),कु.मयुर दिपक नाईक 144 (50%),कु.पुष्पराज मदन धुरी 144 (50%),कु.वैष्णवी संतोष धर्णे 142 (49.30%),कु.तन्वी मनोहर कुबल 128 (44.44%),कु.अस्मिता विश्राम कोंडसकर 114 (39.58%),कु.दुर्वांक विष्णू घाडी 108 (37.50%) गुण प्राप्त केले.सदर विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सिताराम लांबर व आईवडिल, पालक यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी , विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर व वंदना परब , मठ केंद्राचे केंद्र प्रमुख महादेव आव्हाड ,शाळेचे मुख्याध्यापक संजय गोसावी व शिक्षक भिवा सावंत, संचिता सावंत, अर्चना चव्हाण, रेश्मा वरसकर,वर्ग शिक्षक सिताराम लांबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव परब , पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page