मालवण तालुक्यातील धक्कादायक घटना ….
तीन युवकांवर गुन्हा दाखल..

मालवण /-

मालवण शहरालगत असलेल्या किनारपट्टी गावातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर शारिरीक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मालवण पोलीस ठाण्यात तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्काळ कारवाई करत सायंकाळी उशिरा पर्यत तिघांही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर हे मालवणात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर भूषण शरद माडये (वय २२) रा. तारकर्ली-मालवण याच्या सोबत मुलीचे व्हाट्सएपच्या माध्यमातून बोलणे सुरू होते. ओळख वाढत गेली. १२ नोव्हेंबर रोजी मुलीचे आईवडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता मुलगी भूषण सोबत काही अंतरावर असलेल्या निसर्गरम्य तळाशील किनारपट्टी गावात फिरायला गेले.

एका लॉज मध्ये ते गेले. त्यावेळी त्या ठिकाणी प्रथमेश ढोलये (वय २४) रा. धुरीवाडा, मालवण व केशव ध्रुवबाळ फोंडबा (वय २४ रा. सर्जेकोट मालवण हे त्या ठिकाणी आले.

लॉजमध्ये मुलीला घेवून आल्यानंतर भूषण माडये व प्रथमेश ढोलये यांनी मुलीवर शारीरिक अत्याचार केले. तर केशव फोंडबा यांनी शारीरिक लगट करत विनयभंग केला. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३: ३० च्या सुमारास ही घटना घडली.

लॉजवर मुलीवर शारीरिक अत्याचार सुरू असताना प्रथमेश ढोलये यांने घटनेचे मोबाईल मध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले. व्हिडीओ व्हाट्सएप व गुगलवर टाकण्याची धमकीही युवकांनी दिल्याचे मुलीच्या पालकांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून घटनेचा व्हिडीओ चित्रीकरण प्रकरणी ३७६(१), ३७६-२(बी), ३७६-३, ३७६ डी(ए), ३५४ ए(१), ३५४ (सी) व ३४ यासह पोस्को ४, ६, ८, १२, १७ तसेच माहिती तंत्रज्ञान कलम ६६ डी, ६७ (ए) या विविध कलामा नुसार तीन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संध्या गावडे करत आहेत.

मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात दोघा संशयित युवकांना पोलिस निरीक्षक एस एस ओटवणेकर व पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी ताब्यात घेतले. तर प्रथमेश ढोलये हा कुडाळ येथे जात असताना सचिन चव्हाण, धोंडू जानकर व सिद्धेश चिपकर या पथकाने ताब्यात घेतले._

मुलीवर अत्याचार झाले त्या गावातील लॉजची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी असे अनैतिक धंदे सुरू असतात. सखोल चौकशी झाल्यास त्या लॉजमध्ये सुरू असणारे सर्व अनैतिक धंदे समोर येतील. तरी कठोर कारवाई व्हावी. अन्य काही युवतींच्या बाबतीत असे प्रकार घडले आहेत. अशी शक्यता आहे. त्यांचीही चौकशी व्हावी. अशी मागणी मुलीच्या पालकांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page