वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपती मंदिरात शनिवारी लक्ष्मीपूजनादिवशी प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील राज्यभर प्रसिद्ध पावलेल्या या श्री गणेशाचे दिवाळी लक्ष्मीपूजन ते होळी पौर्णिमा (आदल्या दिवशीपर्यंत) या कालावधीत पूजन केले जाते.या कालावधीत या मंदिरात संकष्टी, अंगारकी संकष्टी तसेच श्री गणपतीची जत्रा,वाढदिवस आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरे केले जातात.वेंगुर्ला – गोवा मार्गानजीक हे मंदिर असून या गणपतीचे महत्व सर्वदूर पसरले आहे.
