वेंगुर्ला /-
वजराट नं.१ शाळेने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. कु.विश्वजीत सदानंद पेंडसे (२५८ गुण )सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा आला असून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक व संतोष बाळकृष्ण परब (२१६ गुण) राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.
प्रशाळेचे या परीक्षेस १० विद्यार्थी बसले होते.दहाही विद्यार्थ्यां उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सार्थक प्रकाश कांदे,रिया राघोबा जाधव, कार्तिकी दिगंबर देसाई, अनुष्का आनंद परब, सृष्टी उमेश पालयेकर,उमेश संतोष मेस्त्री, धनश्री रघुनाथ परब व यश महेश राणे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांना त्यांचे पालक, शाळेतील शिक्षक चंद्रकांत गवळी, रेणुका कानसे , कृष्णा खरात , वसुंधरा सुर्वे, तसेच वर्गशिक्षक तेजस बांदिवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेतील शिष्यवृत्ती धारक तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्याचे केंद्रप्रमुख लवू
शाळा,मुख्याध्यापक संजय परब
व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन परब, सर्व सदस्य ,पालक , मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.