महिलांवरील वाढते अत्याचार ही महाराष्ट्रात चिंतेची बाब.; केंद्रीयमंत्री रामदास आठवले

महिलांवरील वाढते अत्याचार ही महाराष्ट्रात चिंतेची बाब.; केंद्रीयमंत्री रामदास आठवले

कोल्हापूर /-

बीड जिल्ह्यात येलंब घाट या ठिकाणी तरुणीवर ऍसिड आणि पेट्रोल ओतून पेटवून देण्याची निर्घृण अमानुष घटना काल घडली. ती मुलगी यातनांनी विव्हळत 12 तास पडून होती. तिला मदत लवकर मिळाली नाही.मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असून या प्रकरणी गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी. महिलांवरील वाढते अत्याचार ही महाराष्ट्रात चिंतेची बाब झाली आहे.हे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार ने त्वरित कठोर पाऊले उचलावीत असे सांगत या अमानुष घटनेचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला आहे.

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत अलिकडे मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पाऊले उचलावीत. महिलांवर अत्याचार वाढत असल्याने राज्यात ही चिंतेची बाब ठरली असून या प्रकरणी राज्य सरकार ने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..