कोल्हापूर /-
दिपावली सणानिमित्त नवीन कपडे,दागदागिने,गोडधोड पदार्थ,वस्तूंची खरेदी आशा अनेक उपक्रमानी दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सहात साजरा करतात. पण नेहमीच जीवन जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष त्यातच गरीबी यामुळे हाताला मिळेल ते काम करून स्वतःबरोबर कुटूंबियांचे पालन पोषण करत पुरूषांबरोबर उन्हात तर कधी पावसात काबाडकष्ट करणा-या महिलावर्ग समाजात लमान मजूर नावाने ओळखल्या जाणा-या उपेक्षित कुटूंबियांची दिवाळीही मोठया आनंदात साजरी व्हावी यासाठी अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व मानव अधिकार सुराक्षा ट्रस्ट यांच्या वतीने व्हनाळी -वाघजाई घाट परिसरात झोपड्या मांडून राहणा-या या गरीब कुटूंबियांना दिपावलीनिमित्त फराळ ,कपडे,ब्लॅंकेट चे वाटप संस्थापक भगवान गुरव,अध्यक्षा माधुरी खोत,सचिव अरूणा पाटील.व मानवअविकार राट्रीय सचिव महमदयासीन शेख यांचे हस्ते करण्यात आले.
लहानमुले,महिलावर्ग यांच्या चेह-यावर फुलेला आनंद हाच खरा आशिर्वाद आपल्या संस्थेच्या यशस्वीतेसाठी प्रोत्सहान देणारा ठरत असल्याचे संस्थापक भगवान गुरव यांनी सांगितले.
यावेळी संजय शिंदे ,मनोज माने महेश नंदे,विनोद चोपडे,राजू पाटील,विठ्ठल आरडे,प्रशांत पाटील, ओंकार मोरस्कर.वेदांत भांदिगरे
वस्ताद प्रमोद पाटील आदी उपस्थीत होते. स्वागत माधुरी खोत यांनी केले तर आभार बंटी पाडळकर यांनी मानले.