वेंगुर्ला /-
वेंगुर्ले येथील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत जो प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, त्यासाठीचा निधी आपण उपलब्ध करून देणार आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार जिल्ह्याची जी मागणी असेल त्या मागणीची पुर्तता आपण करणार,अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेंगुर्ले येथे आढावा बैठकीत दिली.
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले च्या सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपिठावर माजी पालकमंत्री – आमदार दिपक केसरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवास उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रांत सुशांत खांडेकर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, ग्रामपंचायत विभागाच्या पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता श्रीपाद पाताडे, जिल्हा परीषद बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, तहसिलदार प्रवीण लोकरे,वेंगुर्ला पं. स.सभापती अनुश्री कांबळी,न.प.उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,माजी नगराध्यक्ष संदेश निकम,नगरसेविका सुमन निकम, गटविकास अधिकारी उमा पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर , तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तसेच शिवसेना तालुका प्रमुख – माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ,उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर, सचिन देसाई, सुनिल डुबळे, शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,माजी सभापती जयप्रकाश चमणकर, पं. स.
सदस्य सुनिल मोरजकर आदी उपस्थित होते.
यावेळी शासनामार्फत `माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाचा सखोल आढावा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला. तसेच वेंगुर्ले पंचायत समितीच्या नुतन वास्तुची पाहणी केली. त्यामधील निधी अभावी अंतर्गत राहिलेले फर्निचर काम व इतर कामासाठी निधी देण्याचे स्पष्ट केले.