मालवण /-

धक्का मित्रमंडळ मालवण यांच्यावतीने मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत असलेल्या अपुऱ्या रक्त साठ्याची माहिती मिळताच मालवणात नव्याने स्थापन झालेल्या धक्का मित्रमंडळाने आज रक्तदान शिबिर आयोजित केले होते यापूर्वीही धक्का मित्रमंडळाने रक्तदान शिबिर घेतले होते त्यावेळी ६५ रक्तदात्यानी रक्तदान केले होते

या रक्तदान शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर याच्या हस्ते आणि रक्तपेढीचे डॉ.राजेश पालव, मंडळाचे बाबू डायस, हेमंत शिरगावकर राजा शंकरदास, प्रफुल्ल देसाई, यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून झाले यावेळी उदघाटन प्रसंगी अमेय देसाई, गौरेश कांबळी, प्रणव गावकर, नितेश जाधव, भुषण पिसे, छाया कांबळी, आशिष घाडीगावकर, अनिकेत चव्हाण, देवा तोडणकर, महेंद्र पारकर, मनिष कांबळी, रोहित चव्हाण, स्वप्नील कदम, राहुल केळुसकर, प्रथमेश लुडबे, शुभम तोडणकर, गुणेश हडकर, भालचंद्र आपकर, अस्लम अथनीकर, प्रतीक कुबल, नितीन कोटियान, सुरेश नायडू, व मित्रमंडळातील सदस्य उपस्थित होते. तसेच या रक्तदान शिबिरामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे, सिद्धेश चिपकर, जाधव, ढोले, आशिष कदम, योगेश पेंडूरकर, रुग्णवाहिक चालक अकील खान, सुरज भानुशाली, नागरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सदिच्छा भेट दिली. रक्तदान शिबिरातील सहभागी राक्तदात्यांचे मास्क व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. तसेच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचेदेखील मित्रमंडळातर्फे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page