वेंगुर्ले तालुक्यामध्ये १२ शक्ती केंद्र प्रमुखांची नियुक्ती..

वेंगुर्ला /-

मेरा बुथ सबसे मजबूत हे घोषवाक्य घेऊन भाजपाची देशभरात वाटचाल सुरु आहे .त्यामुळेच पक्ष आज ३०२ खासदार असणारा पक्ष बनला आहे व त्यामुळेच देशातील सर्वाधिक सत्तास्थाने या संघटनात्मक योजनेमुळे पादाक्रांत केली. त्यामुळेच भाजपा मध्ये बुथला अनन्यसाधारण महत्त्व आहे,असे प्रतिपादन भाजपा जिल्हा बुथरचना संयोजक महेश सारंग यांनी वेंगुर्ले येथे बुथरचना बैठकीमध्ये केले.
भाजपाच्या संघटन पर्व – २०२० अंतर्गत बुथरचना करण्याबाबत जिल्हा बुथ रचना संयोजक महेश सारंग यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्याची बैठक संपन्न झाली.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा चिटनीस घनःशाम ऊर्फ निलेश सामंत,जिल्हा चिटनीस ऍड. सुषमा खानोलकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत – वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर आदी उपस्थित होते.
यावेळी बुथची रचना करताना शक्ती केंद्र निहाय प्रभारी नेमण्यात आले .तसेच प्रत्येक जि. प. मतदार संघनिहाय जिल्हा पदाधिकारी निरीक्षक म्हणून नेमण्यात आले .तसेच प्रत्येक बुथवर बैठका घेऊन बुथकमिटी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .तसेच प्रत्येक बुथकमीटी मध्ये महीला मोर्चा,युवा मोर्चा तसेच पक्षाच्या विविध आघाड्या व मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सामावून सर्वसमावेशक बुथकमिटी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .
वेंगुर्ले तालुक्यामध्ये संघटनात्मक बांधणीकरीता पंचायत समिती मतदार संघनिहाय शक्ती केंद्र प्रमुख नियुक्ती करण्यात आली.भाजपा मध्ये बुथप्रमुखांमध्ये समन्वय राखण्यासाठी पंचायत समिती निहाय व नगरपरिषद हद्दीत शक्ती केंद्र प्रमुख म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते . त्यानुसार वेंगुर्ले तालुक्यामध्ये १२ शक्ती केंद्र प्रमुखांची नियुक्ती करुन नियुक्तीपत्रे देण्यात आली .
यामध्ये शक्ती केंद्र प्रमुख
६७- म्हापण – गुरुनाथ उर्फ नाथा मडवळ,
६८- परुळे – रुपेश भालचंद्र राणे,
६९- आडेली – विष्णू भिकाजी उर्फ तात्या कोंडसकर,
७०- वायंगणी – प्रशांत खानोलकर ( प्रभारी ),
७१- तुळस – संतोष सिताराम शेटकर,
७२- मातोंड – ज्ञानेश्वर शांताराम केळजी,
७३- उभादांडा – गोविंद क्रुष्णाजी मांजरेकर,
७४- आसोली – विजय नागेश बागकर,
७५- रेडी – जगन्नाथ सगुण राणे,
७६- शिरोडा – विद्याधर ऊर्फ सतिश धानजी,
वेंगुर्ले शहर – नगरसेवक प्रशांत आपटे व नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे यांची निवड करण्यात आली.यावेळी बांदा मंडलाचे महेश धुरी , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष निलेश दत्तात्रेय सामंत , ता.चिटनीस जयंत मोंडकर ,ता.चिटनीस समीर कुडाळकर, ता.चिटनीस नितिन चव्हाण, ता.चिटनीस समीर चिंदरकर, बुथप्रमुख अमित राऊत, नरेश हळणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page