मसुरे /-

कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कांदळगाव येथील विविध क्षेत्रात काम केलेल्या कर्मचारी यांचा सत्कार कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. आरोग्य सेविका सौ दिव्या दत्ताराम पांजरी, आरोग्य सेवक सिध्देश सुहास धुरी, आशा स्वयंसेविका सौ संध्या सुनील कांदळगावकर, सौ स्वाती बाळकृष्ण बेलवलकर, आरोग्य मदतनीस प्रविणा सुरेंद्र हिर्लेकर, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन शांताराम सुर्वे, आशिष जगन्नाथ आचरेकर, अश्विनी आनंद लाड, रमण दशरथ कदम, महावितरण वायरमन प्रसाद श्रीधर मेस्त्री, क्वारंटाईन काळात सेवा देणारे ओझर हायस्कूलचे मुख्याध्यापक पि. आर्. खोत, जिप शाळा कांदळगाव नं १ च्या मुख्याध्यापिका सौ ईजाबेन लुईस फर्नांडिस, शिक्षिका संध्या एकनाथ मेथर, आणि परबवाडा शाळा नं २ मुख्याध्यापिका सौ पल्लवी पांडुरंग राणे, अंगणवाडी सेविका सौ अपर्णा पाटकर, श्रीमती दिपिका बागवे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सदस्य, कर्मचारी यांनी सहकार्य केल्याबद्दल तसेच तिन्ही शाळा कर्मचारी मदत करणारे ग्रामस्थ या सर्वांचे सरपंच सौ उमदी उदय परब यांनी आभार मानले व याही पुढे अशाच प्रकारे सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या वेळी उपसरपंच आनंद आयकर, सदस्य रणजित परब, सदस्या सौ अक्षता अमोल परब, सौ माधवी महेंद्र कदम, सौ श्रद्धा सत्यविजय कुंभार, ग्रामसेवक सागर शिवाजी देसाई, आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन आशिष आचरेकर व आभार ग्रामसेवक देसाई यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page