कुडाळ शहरातील जिजामाता चौक व कुडाळेश्वर रस्त्या बाबत शिवसेनानेते संजय भोगटे यानी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष !

कुडाळ शहरातील जिजामाता चौक व कुडाळेश्वर रस्त्या बाबत शिवसेनानेते संजय भोगटे यानी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष !

कुडाळ /-

कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथील उघड्यावर वाहत असलेले सांडपाणी बंद करण्याबाबत व कुडाळेश्वर मंदिर दरम्यानचा रस्ता भोगस रस्ता केलेल्या ठेकेदारवर कडक कारवाई करावी व तो रस्ता सुस्थितीत करण्याबाबत शिवसेना नेते संजय भोगटे यांनी कुडाळ नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री.गाढवे यांना आपल्या निवेदनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते,सांडपाणी, उघडी गटारे अश्या वेगवेगळ्या विषयावर संजय भोगटे यांनी लक्ष ! वेधले आहे.

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील जिजामाता चौक येथे सांडपाणी उघड्यावर वाहत आहे,त्यामुळे तेथील जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.तसेच काही दिवसांपूर्वी तेथील रहिवासी व रिक्षा व्यावसायिक यांनी आपल्या नगरपंचायतिचे लक्ष वेधले होते.परंतु त्याकडे नगरपंचायतने दुर्लक्ष केल्यामुळे सांडपाणी उघड्यावर वाहतच असल्याने दुर्गधी पसरत चालली आहे.याचा विचार करता जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सदर वाहत असलेल्या सांडपाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा,तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते श्री देव कुडाळेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण एका वर्षापूर्वी केले होते,परंतु माझ्या माहिती प्रमाणे सदर रस्ता सत्ताधारी नगरसेवकांनी स्वतः उभे राहून करून घेतला होता.असे असूनही सदर रस्ता हा निकृष्ठ दर्जाचा झाला आहे.बऱ्याच ठिकाणी खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. तर काही ठिकाणी रस्ता खरडून गेलेला आहे. तर मग या रस्त्याची अशी अवस्था कशी झाली ? रस्ता करत असताना रस्ता चांगला व्हावा म्हणुन कोणत्याप्रकारे लक्ष दिला? काय काय बघितल? रस्ता एका वर्षातच खराब झाल्यामुळे जनतेचे लाखो रुपये फुकट गेलेले आहेत.त्यामुळे सदर रस्ता जाणूनबुजून निकृष्ठ केल्यामुळे संबधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे.तसेच ठेकेदाराकडून संपूर्ण रस्ता पूर्ण डांबरीकरण करून घ्यावा.अश्या वेगवेगळ्या विषयांवर आपल्या निवेदना च्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी श्री.गाढवे यांना लेखी स्वरूपात निवेदन देत,नगरपंचायतचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनानेते श्री.संजय भोगटे यांनी लक्ष ! वेधले आहे.

अभिप्राय द्या..