मालवण /-

मालवण नगरपालिके समोरील वझे कंपाउंड येथे मुख्य वीज वाहिनी ( ११ केव्ही) तुटून पडल्याने आगीचे लोळ उसळल्याची घटना रात्रौ ९ : ३० वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, याबाबत नागरिकांनी माहिती देताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज वितरणला माहिती देत शहराचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. मात्र दरम्यानच्या काळात ज्या ठिकाणी मुख्य वीज वाहिनी तुटून पडली त्या ठिकाणी खड्डा पडून आगीचे लोळ निर्माण झाले होते. खबरदारी म्हणून मार्गावरील वाहतूकही यावेळी रोखण्यात आली.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज वाहिनीतून उसळणारी आग शांत झाली. मात्र प्रवाहित वीज वाहिनीतून निर्माण होणाऱ्या ज्वाला भीतीदायक अश्याच होत्या. रस्त्याच्या बाजूला वझे घरापासून अगदी काही अंतरावर हा प्रकार घडला. सुदैवाने कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही.वीज वितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page