सिंधुदुर्ग /-
एम एच टी सी इ टी २०२० ह्या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर (२४१ विद्यार्थी ) आणि पुणे (२३३ विद्यार्थी ) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विद्यार्थ्याना कोल्हापूर (१७७ विद्यार्थी) येथे परीक्षा केंद्राचे वाटप पीसीएम ह्या गटाच्या परीक्षेकरिता करण्यात आलेले होते.
•- सदर विद्यार्थ्याच्या विनंतीनुसार तसेच मा. मंत्री (उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार सदर विद्यार्थ्याची परीक्षाकेंद्रे बदलून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच देण्यात आलेली आहेत.
•- विद्यार्थ्यांना देण्यात आलेले जुने हॉल तिकीट हे रद्दबातल करण्यात आलेले आहे. नवीन हॉल तिकीट विद्यार्थ्यानी mhtcet2020.mahaonline.gov.in ह्या संकेत स्थळावर लॉग इन करून प्राप्त करून घ्यावे.
•- बदलण्यात आलेल्या परीक्षाकेंद्रांबाबाबतची माहिती एस एम एस आणि ईमेलद्वारे संबंधित विद्यार्थ्याला महाऑनलाईन संस्थेमार्फत पाठविण्यात येईल.
•- विद्यार्थ्याना काही माहिती अथवा तक्रार असल्यास maharashtra.cetcell@gmail.com ह्या ईमेल वर संपर्क करावा.